Monday, November 25, 2013

होई चैत्राचे आगमन..

2003
अब्जावधी जनमानसाचे ओझे वाहिले ज्या साली..
तिथे सौरवाच्या भैरवीला यशश्री हूल देऊन गेली.

2007
लोटली वर्षे चार, उत्कंठा विंडीज़ घरी गेली ..
द्रविड़, कुंबले आदींच्या पदरी तेव्हाही निराशाच आली.

2011
सुरू जाहला प्रवास खडतर, मेहनत केली खास..ढोणी सांभाळी धुरा, गैरी करुन घेई अभ्यास.
उचलला जेतेपदाचा विडा, मैदानी केला नाच.."यंदा करंडक आमचाच!" हा केला सूतोवाच.

मुनाफ-पियूष-शांता, अश्विन नी नेहरा , लेखले यांना हलका मोहरा
"ज़हीर"खंबीर अन "भज्जी"स्थिर, पडला प्रतिस्पर्ध्यांचा चेहरा !
युसूफ आणि सुरेश वाटले ज्यांना कच्चा दुवा..
वेळप्रसंगी काढली त्यांचीच त्यांनी हवा..

द"बंग" वाघाचे अधूरे स्वप्न "धोन्या" वाघाने केले साकार..
गौतम,विराट,वीरूसोबत "युवराज"ने दिला आकार..
कपिल नंतर माहि ठरला जगद्मानाचा धनी,
तृप्त जाहले "भगवंत", न उरले काही मनी..

शाहिदची काढली पिसे, पॉन्टिंगचा काढला बाक
युवापीढीचे लक्ष्मण कापती संगकाराचे नाक..
ढोणीच्या रामसेनेने लंका दिमाखात केलि दहन..
"वर्ल्डकप"ची गुढी उभारू, होई चैत्राचे आगमन |

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

- दिग्विजय देसाई © 2011

No comments: