Sunday, December 15, 2013

लोकल

"प्लेटफोर्म क्र ४ वर येणारी पुढील लोकल,
८ वाजताची दादरला जाणारी जलद लोकल ..."
"अरे ऐकतोस काय गधड्या सूचना कान लावून
गाडी आली, सामान उचल आणि आत ढकल"

"अरे क्या करते हो चुतीया", "साला , पागल!!"
"आई गं", "माझा पाय", "वाचवा..", "माझी चप्पल!!"
"अरे यार क्या भीड है", "I tell you,
I'm gonna buy a new vehicle!!"

२ कोटींच्या मुंबापुरीत ही तर दैनंदिनी
परंतु सर्वांचा भार वाहते लोकल - मालवाहिनी
या लाखमोलाच्या वस्तूवर सर्वांचेच प्रेम नितांत
हिच्या समक्ष झाले कैकांचे उदय, नैकांचे अस्त.

तिच्याकडे नाही भेदभावी नजर
"चला लवकर", म्हणत करते मोठ्ठा गजर
हिला सर्व सारखेच, मनुष्यरूपी खेचर
मग तो असो बालक, युवा वा जराजर

गणपतीपेक्षा हीचे उदर मोठे
त्यावर करी निर्वाह चोर - भामटे
सामान्यांना सुरुवात जरा बिकट वाटे
पण सुगंधी गुलाबाला असणारच काटे

चणेल्यांपासून फळवाल्यांपर्यंत, खेळवाल्यांपासून भेळवाल्यांपर्यंत
याचकांपासून 'चारा'वाल्यांपर्यंत, पोलिशवाल्यापासून मालीश वाल्यापर्यंत
कर्जतपासून मुं.छ.शि.ट.पर्यंत , मुं.छ.शि.ट. पासून पनवेलपर्यंत
२४ x ७ हिला नाही उसंत.. कधी राहिली बंद तर सारे करिती खंत

सर्वांची लाडकी, अर्थातच खिडकी
नाही मिळाली ती तर, दरवाजा पकड की
नऊ सीटरची मधली जागा सगळ्यात रडकी
चौथ्या सीटच्या मोहात जो तो अडकी

मनोरंजनाचेही नाना उपाय
कोणी वाचे पेपर तर कोणी म्युसिकल होई
तीन पत्ती, भैरवीत होते थोडी कमाई
तर बोला जय विठ्ठल रखुमाई

दीडशे वर्षांची आहे हिची परंपरा
गाभ्यात दडला इतिहास सारा
वाचक मंडळी हिचा आदर करा
होऊ देऊ नका हिचा हाल बुरा..

- दिग्विजय देसाई © २०१३

Monday, November 25, 2013

मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका!

राम-रहीम विवाद, सत्तेसाठी
धर्मापरे बोले त्याच्या डोकी काठी..
सीमेवर गोळीबार, बॉम्ब इथे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll

बेरोजगारी-लाचारीला NREGA ने सारा
आत्महत्या-उपासमारीला Food Bill चारा
परप्रांतीय येणारच, उगाच आकांडतांडव करू नका 
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll

भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
नपुंसकत्वाचे पांघरुण अंगावरून ओढू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पाय धरा, कॉलर मात्र धरू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

टीवी वाल्यांसारखे निरर्थक बोलत राहा, डोलत राहा..
आपले मत जातीने-पैशाने तोलत राहा..
मतदान नका करू, पण हक्क सांगणे सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे, तसे नको, उगाच चर्चा झोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

पाणी नसेल नळाला तरी होळी साजरी करा 
वाहतूक सुरळीत आहे? हंडी / विसर्जन करा 
खोकून, गुदमरून मेलात तरी चालेल पण
फटाके फोडण्याचा हट्ट सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि.. नाईट काय
सारेच धुंदीत आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

गांधी रस्ता खड्ड्यात.. चालूच नका
देशसेवा बाता आता.. बोलूच नका
मरणाचीच वाट पहा उगाच राष्ट्र जोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll 

- दिग्विजय देसाई

(शंकर देव यांच्या मूळ कवितेत बरेच बदल करून तीन नवीन अंतरे जोडलेले आहेत)

होई चैत्राचे आगमन..

2003
अब्जावधी जनमानसाचे ओझे वाहिले ज्या साली..
तिथे सौरवाच्या भैरवीला यशश्री हूल देऊन गेली.

2007
लोटली वर्षे चार, उत्कंठा विंडीज़ घरी गेली ..
द्रविड़, कुंबले आदींच्या पदरी तेव्हाही निराशाच आली.

2011
सुरू जाहला प्रवास खडतर, मेहनत केली खास..ढोणी सांभाळी धुरा, गैरी करुन घेई अभ्यास.
उचलला जेतेपदाचा विडा, मैदानी केला नाच.."यंदा करंडक आमचाच!" हा केला सूतोवाच.

मुनाफ-पियूष-शांता, अश्विन नी नेहरा , लेखले यांना हलका मोहरा
"ज़हीर"खंबीर अन "भज्जी"स्थिर, पडला प्रतिस्पर्ध्यांचा चेहरा !
युसूफ आणि सुरेश वाटले ज्यांना कच्चा दुवा..
वेळप्रसंगी काढली त्यांचीच त्यांनी हवा..

द"बंग" वाघाचे अधूरे स्वप्न "धोन्या" वाघाने केले साकार..
गौतम,विराट,वीरूसोबत "युवराज"ने दिला आकार..
कपिल नंतर माहि ठरला जगद्मानाचा धनी,
तृप्त जाहले "भगवंत", न उरले काही मनी..

शाहिदची काढली पिसे, पॉन्टिंगचा काढला बाक
युवापीढीचे लक्ष्मण कापती संगकाराचे नाक..
ढोणीच्या रामसेनेने लंका दिमाखात केलि दहन..
"वर्ल्डकप"ची गुढी उभारू, होई चैत्राचे आगमन |

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

- दिग्विजय देसाई © 2011

I Walk Alone..

Surrounded by faces, 
some familiar, many unknown..
Yet I'm content and at peace, 
as I've learned to walk alone.

I walk alone..


-
iDigvijayDesai
Copyrights Reserved © 2013

Look High. Step Up.

Look high, and say, we've got all that it'll take,
Look high, in the sky, don't let your morals break..

Look deep, and through, one's shadow's all one sees.
Look deep, don't weep, those pearls won't settle seas..


Worship no gods, you're the master of your fate..
Look wise, and calm, your haste will make you late..

One love, to live, and to die for every time.
Look long, have fun, go find some shots and lime.. 

Believe, and honor, the freedom that you've got.
Look far, and beyond, step up, don't wait for the lot.. 



iDigvijayDesai
Copyrights Reserved © 2013